Monday, 4 June 2012

जाहिरात क्षेत्र

जाहिरात क्षेत्र
नमस्कार मित्रांनो,
मी एक जाहिरात क्षेत्रातला विद्यार्थी असून, एका नामांकित संस्थेमध्ये visualiser म्हणून काम करतो.
कालच माझा graduationचा निकाल लागला, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. दहावी बारावीच्या निकालाच्या वेळी जेवढी उत्सुकता होती; ती यावेळी नाही जाणवली. का कोणास ठाऊक, पण मनात एक पक्कं झालंय; मार्क्स मिळवण्यासाठी केलेला आटापिटा आणि मग मिळालेले मार्क्स यातलं अंतर फारसं नसलं तरी हे मार्क्स घेऊन हि डिग्री घेऊन जो जॉब मिळेल तो मनासारखा असेलच असं नाही. त्यामुळे अंगभूत कौशल्य सोबत घेऊन आधीच आपला मार्ग मोकळा करावा हे खूप आधीच ठरवलेलं. आणि म्हणूनच जाहिरात क्षेत्र जवळचं वाटलं.
या क्षेत्रात काम करताना आपल्या बुद्धीला खूप चालना मिळते. आणि समाधान सुद्धा मिळते.
आता हेच बघा, आपण ज्या Federal Express या कुरिअर कंपनीच्या जाहिराती बघतो, या जाहिरातीसाठी येणारा कंपनीचा खर्च प्रचंड आहे. तोदेखील या कंपनीच्या भल्या मोठ्या नावामुळे. पण एका अवलियाने एक शक्कल लढवली, ती म्हणजे त्याने या कंपनीचे नावच लहान करून टाकले. त्याने  Federal Express च्या जागी कंपनीचे नाव केले FedEx. आता पहा; एका भल्या मोठ्या नावाला लागणारी जी जागा होती ती कमी झाली, आणि कंपनीचा जो जाहिरातीवरचा खर्च होता तो देखील कित्येक पटींनी कमी झाला.अशाप्रकारे ज्या अवलियाने हि शक्कल लढवली तो देखील आज जाहिरात क्षेत्रातील एक बडी असामी आहे. या क्षेत्रात काम करताना प्रश्न आहे तो फक्त एका कल्पनेचा. ती कल्पना जर तुमच्या डोक्यात आली, कि पुढे जी कल्पना तुम्ही करू शकत नाहीत ती प्रत्यक्षात अवतरेल. बघा विचार करा! पुन्हा भेटूच!!!